अंतराळ विज्ञानाबाबत रुची निर्माण होण्यासाठी इस्रो घेणार विद्यार्थ्यांची शाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये आंतराळ विज्ञानाबद्दल रुची वाढावी यासाठी इस्रोने पुढाकार घेतला आहे. 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो एक लघु कालावधीचा अभ्यासक्रम घेऊन येत आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्य बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसई च्या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

या अभ्यासक्रमाचे नाव ‘युविका’ असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आंतराळ विज्ञान विषयी अधिक रुची निर्माण होईल. हा अभ्यासक्रम दोन आठवड्यांचा असणार आहे. या अभ्यासक्रमा सामील होणार्‍या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची सर्व सोय सरकारकडून करण्यात येईल.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रोच्या बेंगरुळू, तिरुवनंतपुरम आणि अहमदाबामधील सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उन्हाळ्च्या सुटीत पूर्ण करायचा असून याची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल.