
जॅकी श्रॉफ बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. जॅकी श्रॉफने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता तो ‘द इंटरव्यू: नाइट ऑफ 26/11’ या चित्रपटात झळकणार आहेत. चित्रपटात तो एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ काही इंटीमेट सीन्स करताना देखील दिसणार आहे.
इंटिमेट सीन बद्दल बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाला…
जॅकी श्रॉफला या चित्रपटासाठी इंटीमेट सीन्स शूट करायचे होते. यावर बोलताना जॅकीने सांगितले की, इंटिमेट सीन करताना त्याला लाज वाटायची. मात्र तो असं ही म्हणाला की, अभिनेता म्हणून हा त्याच्या कामाचा एक भाग आहे आणि जर भूमिकेची ही मागणी असेल, तर सीन खराखुरा वाटायला हवा.
इंटिमेट सीन करायला घाबरतो जॅकी श्रॉफ
इंटिमेट सीन करण्यासंदर्भात जॅकी श्रॉफ म्हणाला, ‘मला लाज वाटली. मला खरोखर लाज वाटली. जेव्हा मी अशा प्रकारची गोष्ट करतो तेव्हा घाबरून जातो. मात्र मी हे करत आहे, कारण मी एक अभिनेता आहे.’



























































