
शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सोने आणि चांदी दरात अचानक मोठी घसरण पाहायला मिळाली. तर आज शनिवारी सकाळी बाजार उघडल्यावर 12 हजार 360 रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी प्रति किलो 2 लाख 58 हजार 530 रुपयांपर्यंत घसरली. तर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 1 लाख 56 हजार 560 रुपयांपर्यंत घसरले. दोनच दिवसांत 3296 रुपयांची घट सोन्यात झाली.
अधिक मासासाठी दागिने, भेटवस्तू खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांना त्यामुळे सुखद धक्का बसला. उलाढाल वाढीच्या आशेने सुवर्ण व्यावसायिकांकडूनही मौल्यवान धातूंचे दर कमी झाल्यानंतर समाधान व्यक्त करण्यात आले. पश्चिम आशियातील वाढत्या भूराजकीय तणावामुळे आठवडय़ाच्या सुरुवातीला सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींना सुरुवातीला चांगला आधार मिळाला होता. मात्र, आठवडय़ाच्या अखेरीस परिस्थितीत मोठा बदल दिसून आला. आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने व चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय घसरण नोंदविण्यात आली. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार आठवडाभरात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये बऱयापैकी घसरण झाली.




















































