जालन्यातील परतुर शहरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या पोटात चाकु भोसकून तिचा निर्घृन खून केला. ही घटना जालना जिल्ह्यातील परतुर शहरातील अंबा रोडवरील इंदिरानगरच्या पहिल्या गल्लीत 27 मार्च रोजी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास घडली. मयत महिलेचे नाव झरीना युनुस बागवान (42) असे आहे.

याप्रकरणी परतुर पोलिसांनी पती युनूस बागवान (रा. इंदिरानगर, परतुर) याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा नोंद केला असून, त्याचा शोध सुरू आहे. परतुर शहरातील अंबा रोडवरील इंदिरानगरातील रहिवाशी युनूस बागवान व झरीना नात्याने पती-पत्नी आहेत. युनूस बागवान हा परतुर शहरातील एका हॉटेलमध्ये काम करीत असत. त्यांना 1 मुलगी व 2 मुली अशी अपत्य आहे. मात्र, झरीना हिच्या चारित्र्याच्या संशयावरून युनूस बागवान याने झरीना हिच्या पोटात चाकु भोसकून खून केला.

याबाबत शेख पाशा शेख जैनुद्दीन (रा. इंदिरानगर, परतुर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, झरीना युनूस बागवान ही बघायला माझ्या घरी आली असतांना, पती युनूस बागवान याने तिचा चाकु भोसकून खून केल्याचे म्हटले आहे. याबाबत परतुर पोलिस ठाण्यात शेख पाशा शेख जैनुद्दीन यांच्या फिर्यादीवरून युनूस बागवान याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र ठाकरे करीत आहे.