डॅनिअल क्रेगने No Time to Die च्या खलनायकाचे चुंबन घेतले, सगळेजण अवाक

1414
Daniel Craig And Rami Malek Shared A Kiss

नवाकोऱ्या बाँडपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित करण्यात आला. डॅनिअल क्रेग ( Daniel Craig ) पुन्हा एकदा बाँडपटात दिसणार असून या चित्रपटात तो रामी मालेक ( Rami Malek ) याने साकारलेल्या खलनायकाशी मुकाबला करणार आहे. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान डॅनिअल क्रेगने खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या रामी मालेकचे करकचून चुंबन घेतले. त्याने असं का केलं हे कोणालाच कळालं नाही.

रामी मालेकनेच या गोष्टीचा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने हा प्रकार सांगितला. त्याने सांगितले की No Time to Die चित्रपटातील एका अत्यंत किचकट प्रसंगाबाबत तो डॅनिअल क्रेग आणि चित्रपटाचा दिग्दर्शक सॅम मेंडेस चर्चा करत होते. चर्चा करत असताना सगळ्या अडचणी सुटल्या आणि हे दृश्य कसं करायचं यावर त्यांना उपाय सुचला. रामे मालेकने सांगितलं की हा गुंता सुटल्यानंतर डॅनिअल इतका खूश झाला की त्याने मला कडकडून मिठी मारली आणि उचललं. यानंतर नेमका कोणी पुढाकार घेतला माहिती नाही मात्र आम्ही दोघांनी एकमेकाचे करकचून चुंबन घेतलं. यासाठीचा पुढाकार बहुधा डॅनिअलनेच घेतला असावा असं रामीने हसत सांगितलं. ‘हे चुंबन घेतल्यानंतर मला वाटायला लागलं की मी आता बाँड गर्ल झालोय की काय’ असं रामीने या मुलाखतीत मिश्कीलपणे म्हटलं.

रामी मालेक आणि डॅनिअल क्रेग हे समलिंगी नाहीयेत, या दोघांच्याही प्रेयसी आहेत. मग असं असताना दोघांनी एकमेकांचे असे चुंबन का घेतले या प्रश्नामुळे चित्रपटाच्या सेटवरील सगळेजण हैराण झाले होते. Bohemian Rhapsody या चित्रपटामध्ये रामी मालेकने फ्रेडी मर्क्युरीची भूमिका साकारली असून या भूमिकेसाठी त्याला ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या