जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग येथे दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दलांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे.

अनंतनाग जिल्ह्यातील तंगपावा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जम्मू-कश्मीर पोली आणि सैन्य दलाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवण्यात आली. रविवारी मध्यरात्री दरम्यान संशयित परिसराला घेराबंदी करण्यात आली.

घेराव टाकताच काही घरांतून गोळीबार सुरू झाला आणि रविवारी मध्यरात्री दहशतवादी – सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. सोमवारी सकाळी या चकमकीला यश आलं असून दोन दहशतावादी मारले गेल्याचं वृत्त आहे. अद्यापही ही चकमक सुरू आहे.

दरम्यान, बांदीपोरा जिल्ह्यात लश्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या दोघांकडे खोऱ्यात पुन्हा दहशतवाद पसरवण्याचं काम सोपवण्यात आलं होतं.