जम्मू कश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून एक जवान शहीद झाला आहे.

सैन्याने ज्या दशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे त्यात आदिल वानी या  दहशतवाद्याचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत अनेक बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मजुरांवर हल्ला करण्यात आला होता. वनीचा या हल्ल्यात हात होता. आदिल TRF या दहशतवादी संघटनेचा जिल्हा कमांडर होता.

या चकमकीत 3 जवान जखमी झाले आहेत. त्यापैकी एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून इतर दोन जवानांवर उपचार सुरू अहेत.

15 दिवसांत 15 दहशतवादी ठार

कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 15 दिवसात सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांमध्ये 10 चकमकी उडाल्या. या चकमकीत आतापर्यंत 15 दहशतवादी ठार झाले आहेत.