जम्मू-काश्मीरमध्ये नगरसेवकांच्या बैठकी दरम्यान दहशतवादी हल्ला, नगरसेवकासह दोन जण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागातून दहशतवादी हल्ल्याची एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोपोरमध्ये सोमवारी बीडीसी अध्यक्षा फरीदा खान यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला झाला आहे.

नगरसेवकांची बैठक सुरु असताना हा हल्ला झाला असल्याचे समजते आहे. या हल्ल्यात नगरसेवकासह दोन जण ठार झाले आहेत. तसेच या हल्ल्यात फरीदा खान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर या भागात सैन्याची तैनाती करण्यात आली आहे.

या हल्ल्यात किती दहशतवादी सामील होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही आहे. दहशतवादी अजूनही याच भागात लपून बसलेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिंदुस्थानी जवानांनी हा परिसर घेरला असून शोध मोहीम सुरू केली आहे.