जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा पुढे ढकलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई अॅडव्हान्स्ड-2021 परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आयआयटी खरगपूरने आज ही घोषणा केली. 3 जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार होती. परीक्षेची नवी तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल, असे आयआयटी खरगपूरकडून सांगण्यात आले.

जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण झालेले टॉपचे अडीच लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. देशातील 23 आयआयटी संस्थांमधील इंजिनीयरिंगच्या बॅचलर, मास्टर्स तसेच दुहेरी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा अभ्यासक्रम आयआयटी खरगपूरने नुकताच आपल्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला होता. त्याचप्रमाणे सराव परीक्षा पेपरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोरोनामुळे 2020 ची जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 2021 च्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेला थेट बसण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यांना पुन्हा जेईई-मेन परीक्षा देण्याची गरज नाही.