
राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) फेब्रुवारीच्या सत्रातील जेईई-मेन पेपर-2 चा निकाल आज जाहीर केला. देशात फक्त दोनच विद्यार्थ्यांनी या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवले. महाराष्ट्राचा आदित्य जाधव याने बी. प्लॅनिंगमध्ये तर तेलंगाणाचा वेंकट जोशुला याने बी. आर्पमध्ये 100 टक्के पर्सेंटाईल मिळवले.
पेपर-2 (बॅचलर ऑफ आर्पिटेक्चर) आणि पेपर-2बी (बॅचलर ऑफ प्लॅनिंग) ची परीक्षा 23 फेब्रुवारी रोजी दुपारी देशातील 329 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 81.2 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. देशातील केंद्रांप्रमाणेच परदेशात दोहा, कुवैत, दुबई, काठमांडू, मस्कत, रियाध आणि शारजा या शहरांमध्येही ही परीक्षा घेण्यात आली होती.
- महाराष्ट्रातील अन्य विद्यार्थ्यांनीही या परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करत टॉपर्समध्ये येण्याचा मान मिळवला.
- बी. आर्पमध्ये जीनम भावेश केनिया (99.99 पर्सेंटाईल), अब्दुल्ला चाऊस (99.98), विवेक गोहिल (99.98), सानिका खुणे (99.96), प्रशीक मेश्राम (99.35), समृद्धी कांबळे (99.23) तर बी. प्लॅनिंगमध्ये हिमांशू नागपाल (98.60), राहुल वीरपाचे (97.61), प्रतीक (95.59) हे महाराष्ट्रातील विद्यार्थी टॉपर्स ठरले.
- जेईई-मेन परीक्षेच्या माध्यमातून देशातील आयआयटी, एनआयटी आणि तत्सम केंद्रीय तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश दिले जातात. जेईई-मेन परीक्षा यंदापासून वर्षातून चार वेळा घेतली जाणार आहे.





























































