
सामना ऑनालाईन । रांची
झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी सरकारी कर्मचार्यांसह सामान्य माणसांनाही वेठीस धरण्यास सुरूवात केली आहे. सरकारी योजना यशस्वी होऊ नये यासाठी नक्षलवाद्यांनी स्थानिक शाळेलाही लक्ष्य केले आहे. नक्षलवाद्यांनी शाळकरी मुलांना आणि पालकांना धमकी देण्यास सुरूवात केली आहे. यामुळे काही पालकांनी आपल्या पाल्यास शाळेत पाठवणे बंद केले आहे.
#Jharkhand: Children of naxal affected Chakulia’s Pochpani village carry bow & arrows to school to protect themselves from Naxals. Local says, “The children have to pass through forest area where a number of naxals have been spotted.” pic.twitter.com/TJJlSRsTxG
— ANI (@ANI) November 12, 2018
पण अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या नक्षलवाद्यांशी लढण्याची तयारी दाखवली आहे. अनेक विद्यार्थी शाळेत जाताना हाती धनुष्य बाण घेऊन जातात. विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना अनेकवेळा नक्षलवाद्यांना पाहिले आहे.
गेल्याच महिन्यात झारखंडच्या गिरीडीह जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी रेल्वे रूळ उडवले होए. यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता.
























































