
आजारी पडल्यानंतर नियमित वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी एका कुटुंबाला मांत्रिक आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे चांगलेच जीवावर बेतले आहे. या कुटुंबातील व्यक्तींनी मांत्रिकाच्या सांगण्यावरून राख खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाचजणांचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना झारखंडमधील पलामू जिह्यात घडली आहे.
पडवा प्रखंडातील सिक्का गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही; परंतु त्यांचा मृत्यू हा राखेचे सेवन केल्याने झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. कुटुंबप्रमुख कुलदीप महतो यांचा आधी मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱया दिवशी त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर अन्य तीन जणांचा मृत्यू झाला.



























































