
आल्याचा चहा अनेकांच्या दिवसाची सुरुवात करण्याचा अविभाज्य भाग असतो. सर्दी-खोकला, अपचन किंवा थकवा दूर करण्यासाठीही अनेकजण आल्याचा चहा आवर्जून पितात. मात्र, तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे म्हणून दिवसातून वारंवार पिणे योग्य नाही. तज्ज्ञांच्या मते, आल्याचे अतिसेवन काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते.
दिवसातून किती आलं सुरक्षित?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवसाला 4 ग्रॅमपेक्षा जास्त आल्याचे सेवन टाळावे. केवळ चहातून हे प्रमाण गाठणे कठीण असले, तरी दिवसभर आल्याचा चहा, काढा किंवा आल्याचे इतर पदार्थ घेतल्यास हे प्रमाण सहज वाढू शकते.
जास्त आल्याचा चहा प्यायल्यास काय होऊ शकतं?
छातीत जळजळ किंवा आम्लपित्त
पोटात जळजळ किंवा अस्वस्थता
अपचन
या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी
पित्ताशयाशी संबंधित आजार असलेले
कमी रक्तदाबाचा त्रास असलेले
रक्तदाबाची औषधे घेणारे
रक्त पातळ करणारी औषधे (Blood thinners) घेणारे
रक्तस्रावाचा त्रास असलेले
योग्य प्रमाणात घेतल्यास आल्याचा चहा अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकतो. संशोधनानुसार मळमळ आणि उलट्या कमी करण्यास मदत करतो. तसेच अपचन आणि पोटदुखीपासून आराम देतो. त्याचबरोबर शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपीनंतर होणारी मळमळ कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो. आल्यातील जिंजरॉल हा घटक शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतो.


























































