शिवसेनेची मशाल गावागावात, घराघरात पोहोचवणार, नागोठण्यातील शिवसैनिकांचा निर्धार; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची मशाल गावागावात आणि घराघरात पोहोचवून पुन्हा विजयाचा भगवा फडकवू, असा निर्धार नागोठण्यातील शिवसैनिकांनी केला. नागोठणे विभागप्रमुखपदी प्रकाश मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मेस्त्री यांच्यासह नव्या कार्यकारिणीचा सत्कारही करण्यात आला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विभागीय शाखेत शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यावेळी उपस्थित होते. या बैठकीत नागोठणे विभागप्रमुखपदी प्रकाश मेस्त्री, उपविभागप्रमुखपदी बळीराम बढे व सुरेश गायकर, विभाग संघटकपदी राजेश कामथे यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. स्थानिक पातळीवर पक्षाचा विस्तार करण्यासाठी शिवसैनिकांनी अधिक मजबुतीने कामाला लागावे. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावागावात आणि घराघरात शिवसेनेची मशाल पोहोचवा, असे आवाहन संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी यावेळी केले. विभागप्रमुख प्रकाश मेस्त्री यांनी जनतेच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी चोवीस तास कार्यरत असल्याची ग्वाही दिली. सर्वसामान्यांची कामे करतानाच विभागातील तरुणांच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करू असेही त्यांनी सांगितले. शाखाप्रमुख राजेश सुर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी रोहा उपतालुकाप्रमुख गणपत म्हात्रे, महिला उपजिल्हा संघटक दर्शना जवके, ग्रामपंचायत सदस्य ज्योती राऊत, शहर संपर्कप्रमुख मुकेश भोय, शहर संघटक बाळू रटाटे, उपशाखाप्रमुख पंकज कामथे यांच्यासह लहू तेलंगे, अंजली दुर्गावले, संजय पिंपळे, सुहेल पानसरे, चेतन कामथे, कैलास गोरे, संजय पाटील, श्रीराम मांगले, नागेश सुर्वे, सुभाष बामणे, रुपेश जगताप, मनोज कोळी, सलीम अख्तर, विठ्ठल इंदुलकर, तेजस मिणमिणे, शशिकांत देवळे, राकेश भिसे, आदेश जवके तसेच विभागातील शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.