
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील दहा पोलीस निरीक्षकांच्या आज बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी काढले असून सर्वांनाच बदलीच्या जागी रूजू होण्याच्या सूचना दिण्यात आल्या आहेत.
सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाले यांची बदली रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे, न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक सुर्वे यांच्याकडे सानपाडा पोलीस ठाण्याचा चार्ज देण्यात आला आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील वाघमारे यांच्याकडे एनआरआय तसेच खारघर पोलीस ठाण्यातील दीपाली पाटील यांच्याकडे विमानतळ पोलीस ठाण्याचा चार्ज देण्यात आला आहे. खारघरचे सूरज पाटील यांच्याकडे न्हावा शेवा पोलीस ठाणे तर गुन्हे शाखेचे पृथ्वीराज घोरपडे यांच्याकडे उरण पोलीस ठाण्याचा चार्ज देण्यात आला आहे.



























































