बालकांवरील अत्याचार वाढल्याने दहशत – मुनगंटीवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात बालकांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याने पालकवर्गात प्रचंड दहशत असल्याचा मुद्दा भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे विधानसभेत उपस्थित केला. चंद्रपूर मोरवा गावात पाच वर्षांच्या चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या 61 वर्षीय व्यक्तीने अत्याचार केला. पडोली पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक झाली, परंतु अशा घटनांमुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण आहे. बालकांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अशी मागणी त्यांनी केली.