
सोयाबीन हे वनस्पतीजन्य प्रथिनांचे सर्वोत्तम स्रोत मानले जाते. त्यात शरीरासाठी आवश्यक असलेली सर्व नऊ अत्यावश्यक अमिनो ॲसिड्स असतात. 100 ग्रॅम सुक्या सोया चंक्समध्ये सुमारे 52 ग्रॅम प्रथिने आणि 13 ग्रॅम फायबर असते. तसेच त्यात चरबी कमी असल्याने ते हृदयाच्या आरोग्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठीही उपयुक्त मानले जाते. दुसरीकडे, अंडी हे उच्च दर्जाच्या प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. एका अंड्यात साधारण 6 ग्रॅम प्रथिने मिळतात. याशिवाय व्हिटॅमिन बी12 , व्हिटॅमिन डी, कोलीन आणि आरोग्यदायी चरबीसारखे महत्त्वाचे पोषक घटकही अंड्यांमधून मिळतात. अंड्यातील प्रथिने शरीराला सहज पचतात आणि प्रभावीपणे शोषली जातात.
प्रथिनांची तुलना
100 ग्रॅम सुक्या सोया चंक्स- सुमारे 52 ग्रॅम प्रथिने
25 ग्रॅम सुक्या सोया चंक्स- 13 ग्रॅम प्रथिने
मग सर्वोत्तम पर्याय कोणता?
प्रथिनांच्या प्रमाणाच्या बाबतीत सोयाबीन आघाडीवर असले, तरी प्रथिनांची गुणवत्ता, पचनक्षमता आणि पोषक मूल्यांचा विचार केला तर अंडी अधिक प्रभावी मानली जातात. अंड्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन बी- 12 आणि कोलीनसारखे काही महत्त्वाचे पोषक घटक सोयामध्ये नसतात किंवा अत्यल्प प्रमाणात असतात.
त्यामुळे, अंड्यांऐवजी केवळ सोयाबीन दिल्यास प्रथिनांची गरज काही प्रमाणात पूर्ण होऊ शकते; मात्र इतर आवश्यक पोषक घटकांची भरपाई करण्यासाठी आहारात अतिरिक्त पोषक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे ठरते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या संतुलित पोषणासाठी एकाच पदार्थावर अवलंबून न राहता विविध अन्नघटकांचा समावेश असलेला आहार अधिक योग्य ठरतो.


























































