१७०० विद्यार्थ्यांना मिळणार करियर मंत्र; कल्याणमध्ये उद्या शिवसेनेचा मार्गदर्शन मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने येत्या बुधवारी करियर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बुधवार १ जुलै रोजी सकाळी १० वाजता आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडणार आहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून सुमारे १ हजार ७०० विद्यार्थ्यांना करियरचा गुरुमंत्र मिळणार आहे.

शिवसेनेचे उपनेते विजय साळवी यांच्या पुढाकाराने अनेक वर्षांपासून करियर मार्गदर्शन मेळावा घेतला जातो. यंदाही या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी होणाऱ्या या मार्गदर्शन मेळाव्याला सुमारे १ हजार ७०० विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. करियर मार्गदर्शन शिबिरात विविध कोर्सेस, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन आणि अन्य स्पर्धा परीक्षा याची माहिती दिली जाणार आहे. जळगाव येथील प्राध्यापक यजुर्वेद्र महाजन हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष सत्कार
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा या मेळाव्यात विशेष सत्कार होणार आहे. पहिल्याच प्रयत्नात ‘सीए’ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रुती भोईर हिचा गौरव केला जाणार आहे. तसेच प्राध्यापक, लोककवी प्रशांत मोरे आणि मुंबई विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू, बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेंद्र चंद्रा यांचा यावेळी विशेष सत्कार होणार आहे. विद्यार्थ्यांना वडापाव, फ्रुटी आणि पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात येणार आहे.