
अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या महासत्ता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोव्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन हे दणदणीत विजयी झाले आहेत. फेकूगिरी, आक्रस्ताळेपणा करणारे डोनाल्ड ट्रम्पतात्या हरले असून, त्यांचा दारूण पराभव झाला आहे. चार दिवस सुरू असलेल्या मतमोजणीत बायडन यांना 7 कोटी 48 लाखांवर विक्रमी मते मिळाली. त्यांना तब्बल 284 इलेक्टोरल मते मिळाली. ट्रम्प 214 इलेक्टोरल मतांवरच थांबले. दरम्यान, हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षा होणार आहेत. त्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्षा असतील. जानेवारीत अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडन सूत्रे हाती घेणार आहेत.
गेले चार दिवस अमेरिकेत मतमोजणी सुरू होती. अखेरच्या टप्प्यात जॉर्जिया, पेन्सिलवेनिया, नॉर्थ पॅरिलोना आणि नेवादा या चार राज्यांच्या हातात सत्तेची चावी होती. नेवादामध्ये डेमोव्रॅटिक पक्षाचे बायडन यांनी आघाडी घेतली आहे. त्यांची ही आघाडी कायम आहे. नॉर्थ पॅरिलोना येथे ट्रम्प आघाडीवर आहेत. मात्र, खरी कमाल पेन्सिलवेनिया या राज्यात झाली. बायडन यांचा येथे दणदणीत विजय झाला आणि ट्रम्प यांना पराभव पत्करावा लागला. पेन्सिलवेनिया येथे 20 इलेक्टोरल मते मिळाली. बायडन यांच्याकडे 264 इलेक्टोरल मते होती. त्यांना 270च्या मॅजिक फिगरसाठी 6 मतांची आवश्यकता होती. मात्र, पेन्सिलवेनिया येथील 20 मते मिळाल्यामुळे त्यांच्या इलेक्टोरलची संख्या 284 झाली आहे. 270च्या मॅजिक फिगरपेक्षा त्यांच्याकडे 14 जास्त इलेक्टोरल आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 214 इलेक्टोरल मते आहेत. ज्यो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. 6 वेळा सिनेटर राहिलेले बायडन हे बराक ओबामा यांच्या काळात आठ वर्षे उपराष्ट्राध्यक्ष होते.
7 कोटी 48 लाखांवरील मतांचा विक्रम
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सर्वाधिक पॉप्युलर मते मिळविण्याचा विक्रम ज्यो बायडन यांनी केला आहे. त्यांनी 74847834 एवढी मते आहेत. तर ट्रम्प यांना 70591531 पॉप्युलर मते मिळाली. बायडन यांनी बराक ओबामा यांच्या मतांचाही विक्रम मोडला.
सर्वात तरुण सिनेटर ते वयस्कर राष्ट्राध्यक्ष
ज्यो बायडन 1972 साली पहिल्यांदा अमेरिकन सिनेटमध्ये निवडून गेले तेव्हा ते अवघ्या 30 वर्षांचे सर्वात तरुण सिनेटर होते. पुढील महिन्यात बायडन 78व्या वर्षात पदार्पण करतील. सर्वाधिक वयाचे महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून अनोखा विक्रम त्यांच्या नावावर नोंदविला जाणार आहे.
आता संघर्ष कोर्टात?
दुसऱयांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न भंगल्यामुळे ते सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ज्या स्विंगस्टेटमध्ये बायडन पिछाडीवर होते तेथे त्यांनी आघाडी घेतली. यामुळे येथे घोटाळा झाल्याचा आरोप ट्रम्प मतमोजणी सुरू झाल्यापासून करीत आहेत. त्यासाठी ट्रम्प न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील, असे रिपब्लिकन पक्षाने म्हटले आहे. परंतु यामुळे काहीही फरक पडणार नाही. अमेरिकेन जनतेने बायडन यांना आपला राष्ट्राध्यक्ष निवडल्याचे सीएनएनसह अनेक अमेरिकन मिडिया हाऊसने म्हटले आहे.
अल्पपरिचय
30 वर्षांनी स्वप्न पूर्ण झाले
– जोसेफ रोबिनिटी बायडन (ज्यू) अर्थात ज्यो बायडन यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1942 रोजी पेन्सिलिव्हा राज्यात व्रॅटन येथे झाल़ा
– त्यांचे कुटुंब सुरुवातीला सधन होते. मात्र, अचानक आर्थिक संकटांमुळे परिस्थिती खालावली. त्यांच्या वडिलांनी कार सेल्समन म्हणून काम केले.
– मध्यमवर्गीय वातावरणात ज्यो बायडन यांचे बालपण गेले. हायस्पूलमध्ये ते चांगले फुटबॉल खेळाडू होते. हायस्पूलमध्ये ते स्टुडंट प्रेसिडेंट झाले.
– इतिहास, राज्यशास्त्र्ाात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेतली.
– वकिल म्हणून काम करत असतानाच डेमोव्रॅटिक पक्षाची ते जोडले गेले.
-n 1972 मध्ये ते पहिल्यांदा सिनेट सदस्य म्हणून निवडून गेले, तेव्हा बायडन 30 वर्षांचे होते. 1978, 1984, 1990, 1996, 2002 आणि 2008 असे सहावेळा ते सिनेट सदस्य झाले.
– आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास असलेले बायडन यांनी 1991च्या आखाती युद्धाला विरोध केला. मात्र, युगोस्लावियाने युद्धाला पाठिंबा दिला होता. 2002च्या इराक युद्धाचा ठराव आला तेव्हा पाठिंबा दिला. मात्र, इराकमध्ये अमेरिकन सैनिकांनी तळ ठोपू नये, अशी भूमिका मांडली.
– हिंसाचारविरोधी विधेयकांना त्यांचा पाठिंबा आहे.
– 1998 आणि 2008 मध्ये राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून डेमोव्रॅटिककडून पक्षांतर्गत उमेदवारी मागितली होती. मात्र, दोन्ही वेळेस त्यांच्या उमेदवारीला पक्षात विरोध झाला. 1988 मध्ये राष्ट्राध्यक्ष बनण्याचे पाहिलेले स्वप्न 2020 मध्ये पूर्ण झाले. तब्बल 32 वर्षे त्यांनी वाट पाहिली.
– बायडन यांचा 1972 मध्ये पहिला विवाह झाला होता. अपघातात त्यांची पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. 1977 मध्ये त्यांनी दुसरा विवाह जील यांच्याशी केला.
हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस झाल्या उपराष्ट्राध्यक्षा
56 वर्षीय हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. त्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष असतील. डेमोव्रॅटिक पक्षाच्या सक्रिय सदस्य असलेल्या कमला हॅरिस अनेक वर्षांपासून सिनेट सदस्य आहेत. यांनी निवडणूक निकालाबद्दल अमेरिकन जनतेचे आभार मानले आहे.






























































