
स्वातंत्र्य सैनिक डॉ. परशुराम पाटील यांच्या ‘कलाश्रम’ या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला अभिनव स्पर्धा घेण्यात येते. यावेळेला सरकारी सेविका, आदर्श गृहिणी सारिका एकनाथ धयाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘उत्सवी पाऊस’ ही स्पर्धा घेण्यात आली आहे. स्पर्धकांना तीन पावसाळी छायाचित्रे दिली जातील. त्यातल्या एका छायाचित्राला योग्य शीर्षक देऊन ते शीर्षक का दिले हे स्पर्धकाने व्हिडीओच्या माध्यमातून पाठवायचे आहे. व्हिडीओ दोन मिनिटांचा असावा. विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र दिले जाईल. सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. 27 जून ही स्पर्धेची अंतिम तारीख आहे. स्पर्धा विनामूल्य असून अधिक माहितीसाठी ‘कलाश्रम’च्या संचालिका नंदिनी पाटील यांच्याशी 9869008805 यावर संपर्क साधावा.



























































