
31 वी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट येत्या शनिवार म्हणजेच 6 मेपासून सुरू होतेय. गेली 30 वर्षे न्यू हिंद स्पार्ंटग क्लबने या स्पर्धेचे अफलातून आयोजन करत आपला वेगळा ठसा उमटविला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरातील 16 वर्षांखालील मुलांमध्ये खेळविल्या जाणाऱया या स्पर्धेतील 20 संघ 5 गटांमध्ये विभागलेले आहेत. या स्पर्धेतील सामना दोन दिवसांचा साखळी तसेच बाद पद्धतीने खेळवला जाईल. एकूण 34 सामन्यांची ही स्पर्धा 6 ते 28 मेदरम्यान कांदिवली, विरार, कालिना, माटुंगा, चेंबूर, नवी मुंबईत नेरुळ या ठिकाणी खेळवली जाईल. या स्पर्धेला पार्ले प्रोडक्ट आणि न्यू इंडिया अॅश्युरन्सचे सहकार्य लाभले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन ंिहंदुस्थानी महिला क्रिकेटपटू पूनम राऊत आणि ज्येष्ठ रंगकर्मी विजय पेंकरे यांच्या हस्ते मेजर रमेश दडकर मैदान, माटुंगा येथे 6 मेला सकाळी 8.30 वा पार पडेल.
दरवर्षीप्रमाणे यंदाही एका ज्येष्ठ क्रीडापटूंना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. तसेच न्यू हिंद स्पार्ंटग क्लबतर्फे दिवंगत ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर यांच्या स्मरणार्थ एका क्रीडा पत्रकाराचा मानचिन्ह देऊन सत्कार केला जाणार असल्याची माहिती संयुक्त सचिव चंद्रकांत कोळी यांनी दिली.




























































