
भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना कर्जत-राशीन रस्त्यावरील बेनवडी शिवारात घडली आहे.
आजिनाथ माऊलकर ( 38) व प्रताप शिंदे ( 37, दोघे रा. चिलवडी, ता. कर्जत) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी अनिल माऊलकर ( 43) यांच्या फिर्यादीवरून टँकरचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
आजिनाथ व प्रताप हे कर्जत येथे न्यायालयीन कामकाजासाठी आले होते. काम आटोपून ते राशीनच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना समोरून भरधाव वेगाने कर्जतच्या दिशेने येणाऱ्या टँकरने त्यांना धडक दिली. यात माऊलकर व शिंदे गंभीर जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.



























































