कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा राजीनामा, ‘या’ नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी येडियुरप्पा यांचा राजीनामा स्विकारला असून काळजीवाहू मुख्यमंत्रीपदी राहण्यास सांगितले आहे. सोमवारी येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचे दोन वर्ष पूर्ण केले. तेव्हा एका कार्यक्रमात त्यांनी आपण राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. आता मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत राज्यात उत्सुकता आहे.


या नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपध्यक्ष जेपी नड्डा यांनी कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंह यांच्याशी चर्चा केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्रीपदी मृगेश निरानी, बसवराज बोम्मई यांची वर्णी लागू शकते. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अस्वथ नारायण, आर अशोक, सीटीवी रवि यांची नावे आहेत. तर प्रल्हाद जोशी यांच्याही गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या