Femina Miss India 2022 कर्नाटकच्या सिनी शेट्टी हिने पटकावला ‘मिस इंडिया 2022’चा किताब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानला नवीन मिस इंडिया मिळाली असून कर्नाटकच्या सिनी शेट्टी (Sini Shetty) हिने यंदाचा ‘मिस इंडिया 2022’ (Femina Miss India 2022) हा किताब पटकावला आहे. 3 जुलैला मुंबईमध्ये पार पडलेल्या ‘मिस इंडिया 2022’च्या फायनलमध्ये सिनी शेट्टी हिने 31 स्पर्धकांवर मात करत मिस इंडियाचा मुकूट आपल्या नावावर केला. फायनलमध्ये राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनर अप, तर उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी रनर अप ठरली.

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हन्शन सेंटरमध्ये यंदाच्या ‘मिस इंडिया 2022’ची अंतिम फेरी पार पडली. अंतिम फेरीमध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांनी आपल्या सौंदर्याने आणि हुशारीने सर्वांना भूरळ घातली. मिस इंडियाच्या मुकूटासाठी रुबल शेखावत, सिनी शेट्टी आणि शिनाता चौहान यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. मात्र सिनी शेट्टी हिने बाजी मारत ‘मिस इंडिया 2022’चा बहुमान पटकावला.

6 परिक्षकांच्या पॅनेलने केली निवड

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रंगलेल्या अंतिम फेरीसाठी 6 परिक्षकांच्या पॅनेल होते. परिक्षकांनी स्पर्धकांचे सर्व गुण हेरुन विजेत्याची निवड केली. परिक्षकांच्या पॅनेलमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा, नेहा धुपिया, दिनो मोरिया, राहुल खन्ना, रोहित गांधी आणि शामक डाबर यांचा समावेश होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Femina Miss India (@missindiaorg)

सेलिब्रिटींची हजेरी

‘मिस इंडिया 2022’च्या अंतिम फेरीसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. नेहा धूपिया, कृति सेनन, मलाइका अरोरा, मनीष पॉल, राजकुमार राव, डिनो मोरेया, मिथाली, राज यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अंतिम फेरीत कृति सेनन हिने आपल्या परफॉर्मेंन्सने सर्वांची मनं जिंकली. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य ठरली ती नेहा धुपिया. नेहा धुपिया हिला ‘मिस इंडिया’चा किताब पटकावून 20 वर्ष पूर्ण झाली असून त्याचे सेलिब्रेशन यावेळी करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Femina Miss India (@missindiaorg)

कोण आहे सिनी शेट्टी?

सिनी शेट्टी ही 21 वर्षाची असून तिने अकाऊटींग आणि फायनान्समध्ये शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर भरतनाट्यमचेही धडे तिने गिरवले आहेत. सिनी कर्नाटकमध्ये राहत असली तरी तिचा जन्म मुंबईतील आहे. वयाच्या 14 वर्षापर्यंत तिने अनेक स्टेज शो केलेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Femina Miss India (@missindiaorg)