अमित शहांच्या प्लॅनबद्दल राजनाथ सिंहांना माहितीच नव्हतं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amit-shah-vs-rajnath-singh

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरात पीडीपीसोबतची युती तोडण्याच्या निर्णयाबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना काहीच माहिती नव्हती. वाढत्या दहशतवादाचा मुद्दा पुढे करत भाजपने ही युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रात दोन नंबरचं मंत्रीपद सांभाळणाऱ्या मंत्र्याला देशातील महत्वाच्या घडामोडींबाबत माहिती असणं गरजेचं असतं. मात्र अमित शहांनी प्लॅन तयार केला आणि तो रेटून नेला, ज्याबाबत ना गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांना काही सांगण्यात आलं ना राजनाथ सिंह यांना. यामुळे राजनाथ सिंह हे कागदावर मिरवण्यापुरता दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे मंत्री असल्याचं सिद्ध झालं आहे. भाजपने पीडीपीला दिलेले समर्थन मागे घेतल्याचा निर्णय कळताच राजनाथ सिंह काहीही न बोलता कार्यालयातून थेट घरी निघून गेल्याचंही वृत्त आहे.

राजनाथ सिंह यांची इच्छा होती की शस्त्रसंधी आणखी काही काळ सुरू ठेवावी, मात्र याला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि लष्करप्रमुख बिपीन रावत हे शस्त्रसंधी सुरू ठेवण्यात येऊ नये असं सातत्याने सांगत होते. राजनाथ यांचं न ऐकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शस्त्रसंधी संपल्याचं जाहीर करण्यास सांगितलं होतं. कश्मीरमध्ये सुरू असलेल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय पेचप्रसंग यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनाथ सिंह यांचा सल्ला न घेता अजित डोवाल यांचा सल्ला घेत असतात. असं सांगितलं जातंय की २०१९च्या निवडणुकीपूर्वी कश्मीरमध्ये एक जबरदस्त मोठं ऑपरेशन राबवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.