‘आयएस’शी संबंधित कश्मिरी दांपत्याला दिल्लीतून अटक

466

दिल्ली पोलिसांनी ‘इस्लामिक स्टेट खोरसान प्रॉव्हिस’ (आयएसकेपी) मोडय़ुलशी संबंधित कश्मिरी दांपत्याला आज अटक केली. दिल्लीतील जामियानगर येथून जहांजेब सामी आणि हिंदा बशीर बेग या दांपत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे दोघे ‘सीएए’विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा कापर मुस्लिम तरुणांना चिथावणी देऊन त्यांना दहशतवादी हल्ल्यांसाठी तयार करण्याचे काम करीत होते. पोलिसांना त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक गॅझेट आणि जिहादी कागदपत्रे जप्त केली आहेत. हे दोघे अफगाणिस्तानमध्ये ‘आयएसकेपी’च्या टॉप लीडर्सच्या संपर्कात होते अशी माहिती पोलीस आयुक्त प्रमोदसिंह कुशवाहा यांनी येथे दिली.

गुप्तचर विभागाला जहांजेब हिचा दहशतवादी संघटना ‘आयएसकेपी’शी संबंध असल्याची खबर मिळाली होती. ‘आयएसकेपी’ अफगाणिस्तानमध्ये ‘आयएसआयएस’ची सहयोगी संघटना आहे. जहांजेब हा फिदायीन हल्ला करण्याच्या तयारीत होता. यासाठी त्याने शस्त्रसाठा जमा करणे सुरू केले होते. सध्या त्याचे काम इंटरनेटच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांचा प्रचार करण्यापर्यंतच होते. तो आयएसकेपीला जम्मू-कश्मीरबाहेर संपूर्ण देशात पोहचविण्याच्या तयारीत होता.

जहांजेब सामी याची पत्नी हीना बशीर बेग ही सोशल मीडियावर ‘आयएस’चे समर्थन करणार्‍या हॅण्डलवर सक्रिय होती. ती दहशतवादी कारवायांसाठी तरुणांच्या शोधात होती. प्राथमिक चौकशीत जहांजेबने दिलेल्या माहितीनुसार तो ‘आयएस’चे मॅगझिन ‘स्वात-अल-हिंद’ याच्या फेब्रुकारी महिन्यातील अंक प्रकाशित करण्यात सामील होता. यात ‘सीएए’चा विरोध करणार्‍या लोकांना जिहादी मार्ग निवडण्याचे आवाहन करण्यात आले होते. 24 फेब्रुवारी रोजी हे मॅगझिन ऑनलाइन प्रसिद्ध केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या