बोरिवलीकरांचा केपी फेस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोरिवली पश्चिम येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कस्तुर पार्क यांच्यातर्फे केपी फेस्ट हा सांस्कृतिक क्रीडा महोत्सव 23 ते 25 डिसेंबरला आयोजित केला आहे. यात बॉक्स क्रिकेट, कबड्डी, कॅरम, रनिंग रेस, स्लो सायकलिंग, फुटबॉल, मल्लखांब यासारख्या विविध क्रीडा स्पर्धा आणि सिंगिंग कॉम्पिटिशन, डान्स कॉम्पिटिशन, फॅशन शोसारख्या कलात्मक स्पर्धांचा समावेश आहे. लहान मुलांसाठी श्लोक पाठांतर, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन  यासारख्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. बोरिवली आणि आजूबाजूच्या परिसरातील घरगुती उद्योजकांना आपले प्रॉडक्ट्स विक्रीसाठी ठेवण्याकरिता स्टॉल्सदेखील उपलब्ध आहेत. 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुप्रसिद्ध पॉप गायक लेजली लुईस हे गाणी सादर करतील.