
पाकिस्तानात लपून बसलेल्या खालिस्तानी दहशतवादी लखबीर सिंह रोडे याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला आहे. लखबीर 72 वर्षांचा होता. 2 डिसेंबरला हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने त्याच्या मृत्यूची बातमी लपवून ठेवली होती. ही बातमी कळू नये यासाठी शीख पद्धतीने त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला
पाकिस्तानात लपून बसलेल्या आणखी एका खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंह रोडेचा मृत्यू झाला आहे. लखबीर सिंह हा जनरल सिंह भिडरावाले याचा भाचा होता. तो पाकिस्तानच्या खुफिया एजन्सी आयएसआय च्या इशाऱ्यावर हिंदुस्तानविरोधात पंजाबच्या खलिस्तानी कारवायांमध्ये सहभागी असायचा.
लखबीर सिंह रोडे 72 वर्षांचा होता. त्याने स्वतःला बंदी घातलेल्या खलिस्तान लिबरेशन फोर्स (केएलएफ) आणि इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचे प्रमुख असल्याचे सांगायचा. बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत लखबीर सिंगला ‘वैयक्तिक दहशतवादी’ म्हणून सूचीबद्ध करण्यात आले होते. हिंदुस्थानातून पळून गेल्यानंतर तो पाकिस्तानात राहत होता.






























































