खेड तालूक्यात पूरात एकजण वाहून गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

सामना प्रतिनिधी। खेड

रानात गुरे चारण्यासाठी गेलेल्या नांदीवली येथील एक गुराखी ओढयाला आलेला पुरात वाहून गेला. जानू ढेबे ( 60 ) असे या दुर्देवी गुराख्याचे नाव असून ओढयामध्ये त्यांचा मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी घडल्याचे सांगण्यात येते.

जानू ढेबे हे शनिवारी नेहमीप्रमाणे जनावरे चारण्यासाठी रानात गेले होते . मात्र ते ठरल्या वेळेला घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकानी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली असता ओढ्यात त्यांचा मृतदेह आढळला. गेल्या काही दिवसांपासून खेडमध्ये संततधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नदया- नाले तुडूंब भरून वाहत असून पाण्याच्या जोरदार लोढ्यांमुळे छोटे नाळे किंवा ओहळ ओलांडणे शक्य राहीलेले नाही . रानात गुरे चारण्यासाठी गेलेल्या ढेबे यांचा असाच एक ओढा ओलांडताना त्यांचा मृत्यू झाला . या दूर्घटनेबाबत प्रशासन मात्र अनभिज्ञ होते .