ड्रायव्हरनेच केले मालकाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कारानंतर हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तरप्रदेशच्या बहराइच जिल्ह्यातील बौंडी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. मुलगी वडिलांच्या दुकानातून घरी एकटी जाताना पाहून आरोपीने तिचे अपहरण केले. नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. पोलिसांनी केलेल्या तपासात 12 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हत्या केलेल्या मुलीच्या घरी ड्रायव्हरची नोकरी करत होता.

13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या

बहराइच जिल्ह्यातील बौंडी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात एका गावात रविवारी ही घटना घडली. 13 वर्षीय मुलगी वडीलांच्या दुकानातून घरी जात असताना मुलीचे अपहरण केल्यानंतर नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. नराधम येवढ्यावरच थांबला नाही, त्याने मुलीची हत्या करून मृतदेह तलावाच्या काठावर फेकून दिला होता. ह्या घटनेनंतर पोलीस विभागामध्ये खळबळ उडाली, विभागीय डीआयजी व पोलीस अधिक्षक सुजात सिंह यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच लवकरात लवकर ह्या प्रकरणात सामील असलेल्या आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरला अटक केली.
पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती मिळताच अज्ञात व्यक्ती विरूद्ध बलात्कार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी घडलेल्या घटनेचा तपास करण्याकरता पोलीस पथकांना तैनात करण्यात आले. ह्या प्रकरणात पोलिसांनी 12 तासात आरोपीचा शोध घेऊन अटक केली. आरोपी मृत मुलीच्या घरी ड्रायव्हरची नोकरी करत होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे जबाब नोंदविण्यात आले, तेव्हा आरोपीने केलेले गुन्हे मान्य केले, तसेच ह्या प्रकरणात बहराइचच्या पोलीस उपअधिक्षक सुजाता सिंग यांनी सांगितले की, रेहुआ या गावात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी घडलेल्या घटनेबाबत संबंधीत कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. संशयाच्या व काही पुराव्याच्या आधारे फूलचंद नावाच्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.