बारावीच्या निकालांमध्ये कोकण विभाग राज्यात अव्वल, 93.23 टक्के निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज संकेतस्थळावर जाहिर झाला.राज्यात कोकण विभाग अव्वल ठरले आहे.कोकण बोर्डाचा निकाल 93.23 टक्के लागला. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 92.23 टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 94.23 टक्के लागला आहे.

कोकण विभागातून 31 हजार 764 विद्यार्था परीक्षेला बसले त्यापैकी 29 हजार 612 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.रत्नागिरी जिल्ह्यातून 20 हजार 130 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी 19 हजार 117 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 11 हजार 136 विद्यार्था परीक्षेला बसले त्यापैकी 10 हजार 495 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.