कोल्हापूर – 40 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

प्रातिनिधिक फोटो

मटका जुगाराच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी ४० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचा प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, कॉन्स्टेबल रोहित पवार (बक्कल नंं. 1641) आणि पंटर रोहित रामचंद्र सोरप (रा. उजळाईवाडी, ता. करवीर) असे तिघेजण लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले.यातील पंटर सोरप याला अटक करण्यात आली असुन,पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या मटका जुगार कारवाईत सहआरोपी न करण्यासाठी तक्रारदारकडे प्रथम ६० हजारांची लाच मागितली होती. यातील २० हजाराची लाच तक्रारीपुर्वी घेतली होती. त्यानंतर उर्वरित ४० हजाराची लाच गुरव आणि पवार या दोघांनी मागितली.

आज शनिवारी ही लाच पंटर सोरप याने स्वीकारल्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पो.नि. जितेंद्र पाटील, शरद पोरे, विकास माने, मयूर देसाई, रुपेश माने, संग्राम पाटील, अजय जाधव आदींनी ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या