
सामना ऑनलाईन। कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकांपासून सुरू झालेला राजकीय हिंसाचार अजूनही सुरूच असून भाजपचे बैरकपूर येथील खासदार अर्जुन सिंह यांच्या घराबाहेर बुधवारी रात्री बॉम्ब हल्ला करण्यात आला. हे बॉम्ब भाटपारा येथील मजदूर भवनाजवळ फेकण्यात आले.
दरम्यान, भाटपारा नगर निगमचे प्रमुख आणि अर्जुन सिंह यांचा भाचा सौरभ सिंह यांनी या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यानंतर अर्जुन सिंह यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे.
























































