
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर 100 फुट दरीत कोसळला. या अपघातात कंटेनर चालक अरुणकुमार बाळकृष्ण शर्मा ( 54) गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णायलात दाखल केले होते,मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्य झाला .
कंटेनर क्र. RJ23GB1058 वरील चालक अरणकुमार हे मंगळवारी कंटेनर घेऊन गोव्याहून अहमदाबादकडे जात होता. यावेळी हातखंबा येथील दर्ग्याजवळ त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खोल दरीत कोसळली. या अपघातात जखमी झालेल्या चालकाला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते मात्र त्यांचा मृत्यू झाला .
































































