संगमेश्वरला पावसाने झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी।  संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. संततधार पावसामुळे प्रमुख जिल्हा मार्ग क्र 44 अशी नोंद असलेला आणि तीन गावांना जोडणारा राजिवली , रातांबी – कुटगिरी हा मुख्य रस्ता खचल्याने तीन गावांची एस.टी बससेवा बंद झाली आहे त्यामुळे 80 पेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर प्रवाशांची ही गैरसोय झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी असलेला या मार्गावर अनेक गावे आहेत या प्रमुख जिल्हा मार्गाची सुरुवात आरवली येथे होवून एकूण 39 कि.मी अंतराचा रस्ता असून येडगेवाडी येथे संपतो. पावसाची संततधार सुरु असल्याने आता या रस्त्याची दुरुस्ती कशी आणि कधी होणार असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. महिनाभरावर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवा पूर्वी या खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास गणेश भक्तांची मोठी गैरसोय होणार आहे.