कोपरगाव शहरात हंगामातील बुधवार सर्वात उष्ण दिवस 42 अंश सेल्सिअस नोंदवला गेला

नगर आणि नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती आहे.गेल्या दहा दिवसात कोपरगांवाचा सरासरी सुर्याचा पारा 40 अंशाच्या आसपास राहिला. यात बुधवारी 17 एप्रिल हा या हंगामातील सर्वात उष्ण दिवस 41.28 अंश सेल्सिअस नोंदवला गेला.

गेल्या आठवडाभरातील कोपरगांवचे तपमान माहितीच्या महाजालावर शोधले असता 8 एप्रिल (39.23), 9 एप्रिल (39.24), 10 एप्रिल (40.26), 11 एप्रिल (41.26), 12 एप्रिल (39.27), 13 एप्रिल (39.00), 14 एप्रिल (39.25), 15 एप्रिल (39.24), 16 एप्रिल (39.24), 17 एप्रिल (40.26) अंश तपमानाची नोंद झाली आहे. बुधवारी 17 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तपमानाचा पारा 41.28 अंश सेल्सिअसची नोंद झाली, पहिल्यांदा एवढ्या मोठ्या तापमानाची नोंद झाली आहे. हा आतापर्यंतच्या मोसमातील शहरातील सर्वात उष्ण दिवस होता.

जुने जाणकार वयोवृद्ध नव्वदी गाठलेली मंडळी सांगतात की, आमच्या आयुष्यात आम्ही पहिल्यांदाच एव्हढ्या मोठया प्रमाणांत तपमानाचा अनुभव घेतला आहे. एकेकाळी कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेला कोपरगाव तालुका निसर्ग साधन संपत्ती तसेच नैसर्गिक साधनांची बेसुमार कत्तल होत असल्याने हिरवाईची झालर दिवसा गणित लुप्त होत चालली आहे, बारा महिने बागायती भाग म्हणून ओळख असलेला कोपरगाव तालुक्यात उष्णतेचा जीआर प्रचंड वाढला आहे. या तपमानामुळे उष्माघाताचा फैलाव होवुन त्यातुन दगाफटका होवु शकतो पुन्हा एकदा आपल्याला कोपरगाव कॅलिफोर्निया करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपण करावी लागणार आहे त्याचबरोबर झाडांची कत्तल याला आळा घालावा लागणार आहे यासाठी सरकारी अधिकारी यांनी चोख कर्तव्य बजावण्याची गरज असल्याचे निसर्गप्रेमी यांचे म्हणणे आहे

वाढत्या तपमानाचा फटका मुक्या जनावरांना व पशु पक्षांना जास्त बसत आहे.प्रत्येकाने सामाजिक कर्तव्य म्हणून गाय, बैल शेळ्या शेळ्या इतर प्राणी तसेच विविध प्रकारचे पक्षी यांना आपापल्या घरासमोर , तसेच छतावर पाणी ठेवून पाणी पाजण्याची पुण्य करावे तसेच कोकमठाण येथील गोशाळेत हिरवा चारा दान करावा असे आवाहन निसर्गप्रेमी नागरिकाकडून करण्यात आले आहे.

तेंव्हा प्रत्येकांने काळजी घ्यावी काम असेल तरच घराबाहेर पडावे. उन्हापासुन संरक्षण होण्यांसाठी आवश्यक चष्म्यांचा, टोप्यांचा, छत्रीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, कांदा जवळ बाळगावा. घरात लहान बाळ, चिमुकली मुले मुली असतील तर त्यांची प्रत्येक माता पित्यांने काळजी घ्यावी, दिवसभरात त्यांना पिण्यांचे पाणी भरपुर द्यावे. वयाने मोठ्या असलेल्या नागरिकांनी व वयोवृध्द रूग्णांनी सुध्दा स्वतःला जपावे., थंडपेयापेक्षा कैरीचे, चिंचेचे पन्ह, लिंबु सरबत, उसाचा रस, ताक यांचा समावेश आहारामध्ये वाढवावा. रूग्णांनी वैद्यकिय अधिका-यांच्या सल्ल्याने आहार संतुलन ठेवावे.
– डॉ. कृष्णा फुलसौंदर तालुका वैद्यकीय अधिकारी (कोपरगाव ग्रामीण रुग्णालय)