कोपरगाव प्रकरणातील मुख्य आरोपी सायम कुरेशीला अटक; सहा दिवसांची पोलीस कोठडी

मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, लग्नाच्या आमिषाने कोपरगावातील तरुणीवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी सायम कुरेशीला इंदूर येथून अटक केली आहे. कोपरगाव पोलिसांनी गुरुवारी पहाटे ही कारवाई केली. न्यायालयाने कुरेशी याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित तरुणीला सायम कुरेशीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला. त्याचे त्याने चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवित पीडितेला इंदूर येथे बोलविले. त्याने तिथे मौलवीच्या साहाय्याने तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने स्वतः सुटका केल्यानंतर तिने सायमसह त्याचे मित्र व मौलवी यांच्या विरोधात तक्रार दिली होती. या घटनेतील मुख्य आरोपी सायम हा त्याच्या मूळ गावी पळून गेला होता. आज कोपरगाव पोलिसांनी त्याला इंदूर येथून अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, राम खारतोडे, गणेश मैड, संभाजी शिंदे यांच्या पथकाने कारवाई केली.