
कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात धुवाँधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद 49 हजार 325 क्युसेकवर गेली असून, पाणीसाठय़ात तब्बल 4.26 टीएमसीने वाढ झाली आहे. कोयनेच्या धरणपायथा विद्युतगृहातून सायंकाळी 5 वाजता एक हजार 50 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. काल रात्रीपासून जिह्याच्या पश्चिम भागात ‘कोसळधार’ सुरू असून, अन्य धरणांचा पाणीसाठाही वाढत चालला आहे. जिह्यात नद्या ओसंडून वाहायला लागल्या असून, नद्यांकाठी पुराच्या आणि डोंगरी भागात दरडींच्या भीतीने लोकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. मात्र, माण-खटावसारख्या दुष्काळी पट्टय़ात पावसाअभावी चिंता आहे.
गेल्या काही वर्षांत जूनपेक्षा जुलैमध्येच खरा पावसाळा अनुभवास येत आहे. यंदाही तोच अनुभव येत असून, गेले आठवडाभर जिह्यात दमदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद 49 हजार 325 क्युसेकवर गेली आहे. सकाळी आट वाजता संपलेल्या 24 तासांत कोयनानगरला 123 (आजअखेर 1563), नवजाला 142 (2000), महाबळेश्वरला 136 (1904) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 40.63 टीएमसीवर गेला आहे. सायंकाळी पाच वाजता धरणपायथा वीजगृहातून कोयना नदीपात्रात एक हजार 50 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, कोयना धरणात पाकसाळ्यातील पाऊस क त्या-त्या दिकसासाठी घालून दिलेला पाणीसाठा लक्षात घेता, सध्या धरणात अपेक्षेइतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. म्हणूनच आगामी काळातील पाऊस, येणाऱया पाण्याचे प्रमाण, पूर्केकडे सोडाके लागणारे पाणी, आगामी काळातील संभाक्य महापुराची तीक्रता आदी सर्क गोष्टी लक्षात घेता, बुधकारी संध्याकाळी कोयना धरणपायथा कीजगृहातील एका जनित्राद्वारे कीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाणी पूर्केकडे कोयना नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या धरणात सरासरी चार टीएमसी पाण्याची आकक होत आहे. अशा पद्धतीची आकक झाली तर लककरच पायथा कीजगृहातील दोन्ही जनित्रांद्वारे कीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा किचार असल्याची माहिती कोयना धरण क्यकस्थापनाचे उपअभियंता आशीष जाधक यांनी दिली.































































