
सामना प्रतिनिधी। मुंबई
दिंडोशी येथे दिवाळीनिमित्त ‘कुरारगाव महोत्सव 2018’ चे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या महोत्सवाला शुक्रवारी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते आणि विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी विधानसभा संघटक विष्णू सावंत, प्रशांत कदम, रीना सुर्वे, पूजा चौहान, दिंडोशीतील शिवसेना, युवासेना, भा. वि. सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, व्यापारी सेना, वाहतूक सेना सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


























































