वसईत अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

वसईत एका अल्पवयीन गतीमंद मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला 24 तासांत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी वसईत एका मजुराने एका 16 वर्षीय गतीमंद मुलीचे अपहरण केले. नंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिथून पोबारा केला. एका स्थानिक रहिवासी व्यक्तीला पीडित मुलगी दिसली. त्याने तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीच चाचणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पण्ण झाले.

पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. तसेच आरोपीने या आधी अशा प्रकारचा गुन्हा केला आहे का याचा तपास पोलीस घेत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या