
हिंदुस्थानच्या सर्वात मोठय़ा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत म्हणजेच रणजी करंडक स्पर्धेत प्रथमच महिला पंच दिसणार आहेत. मुंबईच्या वृंदा राठी, चेन्नईच्या जननी नारायण आणि गायत्री वेणुगोपालन यांचा पंच पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे.
‘बीसीसीआय’ने नवीन हंगामासाठी बनविलेल्या पंच पॅनेलमध्ये तीन महिलांचा समावेश केला आहे. या स्पर्धेच्या 88 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलांना पंच पॅनेलमध्ये स्थान मिळाले आहे. 13 डिसेंबरपासून सुरू होणाऱया रणजी स्पर्धेत आता महिला पंचही दिसणार आहेत. वृंदा ही स्कोअरर होती, तर जननीने पंच होण्यासाठी नोकरी सोडली आहे. महिला पंचांनाही पुरुषांच्या बरोबरीने मानधन मिळणार आहे.
2017मध्ये बीसीसीआयच्या पंच पॅनेलमध्ये पहिल्यांदा महिलांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर पॅनलमध्ये फक्त 2 महिला पंच होत्या. आणखी एक महिला पंच 2018मध्ये सामील झाली होती.
























































