
सामना ऑनलाईन, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वापे आणि मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे आंबोली घाटात दरड कोसळणे आणि झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार सातत्याने घडायला लागले आहे. मंगळवारी म्हणजेच 6 ऑगस्टला या घाटामध्ये दरड कोसळली होती. बुधवारी म्हणजे 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ला पुन्हा या घाटात दरड कोसळली आहे. आंबोलीतील मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर ही दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने आंबोली घाट मार्ग ठप्प झाला आहे.




























































