
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा भरती प्रक्रियेसाठी शुक्रवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गट ब आणि गट क संवर्गातील तब्बल 8 हजार 169 पदांवर भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी एमपीएससीने 30 एप्रिल रोजी संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन जिल्हा पेंद्रावर केले आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यासाठी एमपीएससीने नववर्षात आनंदाची बातमी दिली आहे. एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. राज्यातील 37 जिल्हा पेंद्रावर पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. सर्वाधिक पदे ही लिपिक आणि टंकलेखक संवर्गातील आहेत. या वर्गात 7 हजार 34 पदे भरली जाणार आहेत.
अशी आहे प्रक्रिया
- अर्ज करणे – 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी
- ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणे – 14 फेब्रुवारीपर्यंत
- भारतीय स्टेट बॅंकेत चलनाची प्रत देणे – 16 फेब्रुवारीपर्यंत
- चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरणे – 19 फेब्रुवारी



























































