अविनाश चव्हाण खून प्रकरण, चौकशीवेळी हाती लागली दोन पिस्तूलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । केज

स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेसचे अविनाश चव्हाण खून प्रकरण लातूर केज कनेक्शन लागल्यानंतर केजमधून एकाला लातूर पोलिंसानी अटक केली आहे. चौकशीवेळी आणखीन एक पिस्तूल सापडले आहे.

केज येथील रमेश श्रींमत मुंडे (वय ३५) यांनी मारेकऱ्यांस दीड लाखात पिस्तूल पुरवले होते त्या पिस्तुलने आविनाश चव्हाण यांची हत्या करण्यात आली होती. मुंडे यास अटक केल्यानंतर रमेश मुंडे याने गुन्हा कबूल केला आहे. चौकशी दरम्यान रात्री लातूरचे पोलीस उपअधिक्षक हिम्मत जाधव व पोलीस निरीक्षक नाना साहेब लाकाल यांनी पोलीस कोठडीत असलेल्या रमेश मुंडेस पोलिसी खाक्या दाखवल्या नंतर आपल्याकडे आणखी एक पिस्तुल असल्याचे संगितले. काल रात्री चौकशीत समर्थ नगर केज येथील घराची झाडा झडती घेतली त्यामध्ये रमेश मुंडेच्या घरात दुसरे पिस्तूल सापडले. ते पिस्तूल कुणाला विकणार होता हे चौकशीत समोर येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात अजून काही आरोपी हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, रमेश मुंडे यास सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.