
कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दारू विक्रीवर बंदी घातली असतानाही खुलेआम दारूची विक्री सुरु आहे. अशातच चाकुर येथील एका ढाब्यावर पोलीसांनी छापा टाकून कार व टेम्पोसह दहा लाख रूपयांची देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करत मोठी कार्यवाही केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने सर्व दारूचे दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे .माञ नांदेड – लातुर रोडवरील अलगरवाडी जवळील धाब्यावर मोठ्या प्रमाणात दारूची खुलेआम विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांना मिळाली असता त्यांनी सपोनि बालाजी तोटेवाड,पोउपनि ञ्यंबक गायकवाड, खंडु दर्शने,पोहेकाँ रामचंद्र गुंडरे,शाहु बनसोडे,दत्ता थोरमोटे,तानाजी आरदवाड,पाराजी पुठ्ठेवाड आदीना सोबत घेऊन ढाब्यावर धाड मारली असता कार व टेम्पोमधून खुलेआम दारूची विक्री होत असताना आढळून आली. एक हजार सातशे बाटल देशी दारू, विदेशी व बियरच्या बाटल आढळून आल्या असून कार क्रं.एम.एच.24 ए.एस.8350 व टेम्पो क्रं.एम.एच.26 बी.इ.0466 यासह 9 लाख 79 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला असून ढाबा चालक नामदेव रामचंद्र घुमे यांना पोलीसांनी अटक केली आहे .तर व्यंकटेश घुमे हा फरार असल्याचे पोलीसांनी सांगितले.
































































