
विभागीय परिक्षा मंडळाच्यावतीने बुधवारी संकेतस्थळावर बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. लातूर विभागीय परिक्षा मंडळाचा निकाल 95.25 टक्के लागला आहे. या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 96.59 टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 94.21 टक्के एवढे आहे. लातूर विभागात सर्वाधिक निकाल हा लातूर जिल्ह्याचा आहे. लातूर जिल्ह्याचा निकाल 96.22 टक्के, नांदेड जिल्ह्याचा निकाल 94.90 टक्के तर धाराशिव जिल्ह्याचा निकाल 93.98 टक्के लागलेला आहे.
लातूर विभागीय परिक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या मार्च 2022 परिक्षेच्या निकालाची घोषणा संकेतस्थळावर करण्यात आली.लातूर विभागातील 88830 विद्यार्थ्यांपैकी 84615 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल 95.25 टक्के लागला आहे. लातूर विभागातील 90226 विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी आवेदनपत्रे भरली होती. 88830 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यामध्ये 84614 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागात असलेल्या लातूर जिल्ह्याचा निकाल 96.22 टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्याचा निकाल 94.90 टक्के तर धाराशिव जिल्ह्याचा निकाल 93.98 टक्के लागला आहे.
लातूर विभागातील 18172 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. 41510 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये,23222 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये तर 1711 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये पास झालेले आहेत. लातूर विभागातील नांदेड जिल्ह्यातील 37829 विद्यार्थ्यांपैकी 35900 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यामध्ये 19844 मुले आणि 16056 मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 93.80 टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 96.28 टक्के आहे. धाराशिव जिल्ह्यातील 16034 विद्यार्थ्यापैकी 15069 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. यामध्ये 8181 मुले आणि 6888 मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 92.80 टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 95.98 टक्के आहे. लातूर जिल्ह्यातील 34967 विद्यार्थ्यांपैकी 33646 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. यामध्ये 14655 मुले आणि 18991 मुलींचा समावेश आहे.
लातूर विभागातील विज्ञान शाखेचा निकाल 98.30 टक्के लागला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल 98.31 टक्के, धाराशिव जिल्ह्याचा निकाल 97.69 टक्के तर लातूर जिल्ह्याचा निकाल 98.54 टक्के लागला आहे. लातूर विभागातील कला शाखेचा निकाल 91.89 टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्याचा कला शाखेचा निकाल 91.55 टक्के, धाराशिव जिल्ह्याचा कला शाखेचा निकाल 90.10 टक्के तर लातूर जिल्ह्याचा कला शाखेचा निकाल 93.41 टक्के लागला आहे. लातूर विभागातील वाणिज्य शाखेचा निकाल 95.34 टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्याचा वाणिज्य शाखेचा निकाल 95.19 टक्के, धाराशिव जिल्ह्याचा 93.70 तर लातूर जिल्ह्याचा निकाल 96.05 टक्के लागला आहे.
लातूर विभागातील व्होकेशनल विभागाचा निकाल 91.60 टक्के लागला आहे. नांदेड जिल्ह्यचा 86.77 टक्के, धाराशिव जिल्ह्याचा 92.36 टक्के तर लातूर जिल्ह्याचा निकाल 93.03 टक्के लागला आहे. लातूर विभागातील मराठी भाषेचा निकाल 98.08 टक्के, इंग्रजी भाषेचा निकाल 96.10 टक्के, हिंदी भाषेचा निकाल 98.36 टक्के, संस्कृत भाषेचा निकाल 99.77 टक्के लागलेला आहे.
























































