औराद शहाजानी येथे थंडीत गारठून शेतकऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। औराद शहाजानी

गेल्या दोन दिवसांपासून औराद शहाजानी व परिसरात थंडीचा कडाका वाढल्यामुळे यंदाची निचांकी तापमान 4 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. दरम्यान निलंगा तालुक्यातील सावरी येथे रात्री शेतवस्तीवर मुक्कामास गेलेले व्यंकट बाजीराव जाधव वय 62 वर्ष या शेतकऱ्याचा थंडीने गारठून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शेत वस्तीवरील पत्र्याच्या शेडमध्ये बाजीराव झोपले होते. रात्री थंडीचा कडाका वाढल्यामुळे पहाटेच्या दरम्यान गारठून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत व्यंकट जाधव यांचे नातेवाईक नरसिंग जाधव यांना विचारले असता त्यांनी व्यंकट जाधव यांचा मृत्यू थंडीमुळे झाल्याचे सांगण्यात आले.