अज्ञात व्यक्तीने कडब्याच्या गंजीना लावली आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
latur-tandulja

लातुर तालुक्यातील तांदुळजा येथील ज्ञानेश्वर पांडुरंग गव्हाणे यांच्या राहत्या घराजवळील साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या गुळ्याचे व चार हजार ज्वारीच्या कडब्याच्या गंजीना अज्ञात व्यक्तीने आग लावून लाख रुपयांचे नुकसान केले आहे.

ज्ञानेश्वर गव्हाणे (वय वर्ष 25) यांना गुंठाभर जमीन नसतानाही स्वतःच्या जिद्दीवर पाच गाई सांभाळून दुधाच्या पैश्यातून स्वतःचा व कुटुंबाचा गाडा चालवतात. मागील काही महिन्यापूर्वीच वडील निधन पावले, घरात आई व ज्ञानेश्वर दोघेच असतात. आई मोलमजुरी करते तर ज्ञानेश्वर दिवसभर गाईची देखभाल करतात. गाईंना वर्षभर चारा लागणार म्हणून त्यांनी आत्ताच ज्वारीचा कडबा विकत घेऊन घराजवळच गंजी घातल्या होत्या. पण 10 मे 2023 रोजी दुपारी 2 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बानीमा पेटवून दिल्या. तिन्ही बनीमी खाक. 11 मे च्या दुपारपर्यंत आग धगधगत होती.