लातूर – चाकूचा धाक दाखवून उदगीर येथे वृद्ध कुटुंबास लुटले, 4 लाख 50 हजाराचा ऐवज पळवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदगीर शहरातील डॅमरोड भागातील घरात घुसून अज्ञात दोघांनी घरातील वृध्दांना चाकूचा धाक दाखवून 4 लाख 50 हजाराचा ऐवज पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात सुभाष नरहरराव नेत्रगावकर (वय 78) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, अज्ञात दोन इसम त्यांच्या घरात घुसले. चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या पत्नीच्या अंगावरील 9 तोळ्याचे सोन्याचे दागीने (किंमत 4 लाख 50 हजार रुपये) बळजबरीने चोरुन नेले.

उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सिंगनकर हे करीत आहेत.