दोन मोटर सायकलच्या धडकेत एक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर ताजबंद – वळसंगी मार्गावर दोन मोटार सायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात दोन जण जखमी झाले असून यातील एकजणाची प्रकृती गंभीर आहे.

मांडणी पाटी ते वळसंगी पाटी दरम्यान गुरुवारी सायंकाळी हा अपघात झाला. यात गोविंद ज्ञानोबा कोदळे (30) रा .गोताळा ता. अहमदपुर याचा जागीच मृत्यु झाला. तर राजेश धोडींबा बोडके वय (35) वर्ष रा. वळसंगी ता. अहमदपुर हा गंभीर जख्मी झाला असून अहमदपुर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातुर येथे पाठवण्यात आले .तर प्रकाश जगताप वय ( 30 ) रा. गोताळा हा किरकोळ जख्मी आहे.